Friday, October 28, 2016

आम्ही पुन्हा एकदा जन्माला येऊ.......

महाराष्ट्राची भुमी ही अनेक रक्तरंजित ईतिहासाची साक्षीदार आहे. त्यापैकीच एक चारशे वर्षापुर्वीचा ईतिहास माँसाहेब जिजाऊ या वाघीणीणे जन्माला घातलेले वादळ म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज या वादळाचे नुसते नाव जरी घेतले. तरी काय होते हे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत खिंड लढणार्‍या बाजीप्रभू देशपांडे यांना विचारा. पिसाळलेल्या हत्तीला निशस्त्र ठार करणार्‍या (मला नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा येतोय) येसाजी कंक यांना विचारा. आणखी विचारायचेच असेल तर त्या फक्त सात मावळ्यांना विचारा ज्यांनी साडेतीन हजार शत्रूचा एका दमात खात्मा केला. घेऊ आम्ही पुन्हा एकदा जन्म पण त्यासाठी अगोदर आमच्या मातोश्री जिजाऊना जन्म घ्यावा लागेल. पण आज त्याच सुरक्षित नाहीत तर मग आम्ही तरी कसे जन्माला येऊ. आजकालची पोरं जिममधे जाऊन नुसतेच दंड फुगवतायत आणि कमजोर घटकावर मर्दुमकी गाजवतायत पण ज्या वेळी आमच्या माँसाहेबवर अत्याचार झाले त्यावेळी कुठे गेली होती ही मर्दुमकी. ..? बर या सगळ्यातून जरी आम्ही जन्म घेतला तरी आमचे बाजीप्रभू, येसाजी, संताजी, जिवा महाले, आणि स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणारी आमची रयत भेटेल का हो.

- ज्ञानेश्वर सुनिता संभाजी शिंदे

No comments:

Post a Comment