Friday, October 28, 2016

व्यथा

नका करू माझी कुचेष्टा
नका काढू मोर्चा
नका टाकू मला जातीच्या दलदलीत
न्यायासाठी झगडतेय मी
तो मिळत नाही कोणत्याच न्यायालयात
तुम्ही तरी द्याल का हो न्याय मला
ही नाही माझ्या एकटीचीच व्यथा
वाटले होते
आयुष्य खुप सुंदर आहे
खुप शिकायच होतं
मोठ्या हुद्द्यावर जायचं होत
आता कुठे जगायला शिकले होते.
पण कुठे चुकले मी हेच उमजेना
आता येतोय याच आयुष्याचा किळस
सगळीकडे वावरतायत पिसाळलेले लांडगे
मी तर चालले.....
परत कधीच न येण्यासाठी
पण माझ्या
मायची आणि तायची कोण करील राखण
तुम्ही तरी कराल का माझी शेवटची ईच्छा पुरी नाहीतर पुन्हा एकदा घडेल निर्भया आणि कोपर्डी

No comments:

Post a Comment