"छत्रपती शिवाजी महाराज" एक क्रांतीसुर्य जो गेली चार शतके त्याच प्रखरतेने तळपतो आहे.
शिवाजी महाराज हे एक असे व्यक्तीमत्व आहे. जसे एका हिर्याला अनेक पैलू असतात अगदी
त्याचप्रमाणे शिवरायांचे अनेक पैलू आहेत.
● एक राजा म्हणून त्यांनी आपल्या रयतेला पोटच्या मुलाप्रमाणे जपले.
● एक न्यायाधीश म्हणून योग्य न्याय करून गुन्हेगारांना दंड दिला.
● एक राजकारणी म्हणून कुटनीती वापरून शत्रूला नामोहरम केले.
● एक इंजिनिअर म्हणून रायगडासारखी राजधानी आणि सिंधुदुर्ग सारखी जगविख्यात वास्तु उभारल्या
● एक अर्थतज्ज्ञ ज्याच्या संपूर्ण हयातीत स्वराज्यात कधी आर्थिक मंदी आली नाही.
● एक यौद्धा म्हणून ( स्वराज्य ) साम्राज्य उभे केले.
● समुद्रात आरमार उभे करणारा पहिला आणि एकमेव राजा
● एक पुत्र ज्यांनी पर स्त्री ला माते समान मानले.
● एक पिता ज्यांनी संभाजी राजासारख्या छाव्याला जन्म दिला.
किती किती म्हणून महाराजांचे पैलू सांगू .
आज चारशे वर्षे झाली तरी आपल्याला महाराजांची गरज पडते.
आहो महाराजांनी त्यांचा एक एक मावळा असा तयार केला होता की त्यांच्या गैरहजेरीत ही तो शत्रूला नेस्तनाबूत करत होता.
आम्ही काय बांगड्या भरल्यात का बांगड्या ?
हो... भरल्यात बांगड्या म्हणून तर कोपर्डीसारखी मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आणि अशा असंख्य घटना घडतायत.
आणि आम्ही नुसतेच कँडल मार्च काढतोय, मुक मोर्चा काढतोय आणि काहीजण नुसतीच बघ्यांची भुमिका साकारतायत .
हे सर्व होत असताना.
छत्रपती शिवरायांना ही प्रश्न पडला असेल.
" याच मातीत मी जन्म घेतला होता का ?
आणि हेच आपले वारसदार का " ?
ज्यांचा हातात काकणं होती. त्यांनी ही काकणं उतरवून हतात समशेरी घेऊन शत्रूला कापले होते हे विसरु नका.
आणि ती जर वेळ पुन्हा आली तर या भुतलावरुन पुरुषार्थाचा नायनाट होईल.
आमच्यात पुरुषार्थ आता फक्त नावाला उरलाय म्हणूनतर आम्ही फक्त निषेध करण्यात धन्यता मानतोय.
बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, जिवा महाले, संताजी घोरपडे,
आणि आपल्या वेडापायी दवडलेले ते सात वीर अशा असंख्य ज्ञात अज्ञात महापुरुषांनी याच महाराष्ट्रासाठी स्वतःच्या रक्ताचे पाट वाहीलेत.
का..........?
त्यांना वेड लागले होते म्हणून. ..?
हो.....
लागले होते त्यांना वेड त्यांना वेड लागले होते स्वराज्याचे त्यांना वेड लागले होते स्वातंत्र्याचे.
आणि आज त्याच महापुरुषांची आम्ही जातीनिहाय वाटणीच करून टाकली आहे.
याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणतीच असू शकत नाही
आजचे काही राजकीय पक्ष हे स्वतःच्या स्वार्थासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे भांडवल करतायत आणि आम्ही मुकाट पणे सहन करून यात अडकत चाललोय.
जपान हा देश जगाच्या नकाशावर जरी अगदी छोटा वाटत असला तरी त्यांच्याकडे ज्याप्रकारची जिद्द आहे ती जगातील कोणत्याच देशाकडे नाही .
म्हणून तर हिरोशिमा, नागासाकी वर कोसळलेली मानवनिर्मित आपत्ती असो किंवा भुकंप , सुनामी सारखी नैसर्गिक आपत्ती असो.
या सगळ्यातून जपान अगदी फिनिक्स पक्षासारखी पुन्हा पुन्हा भरारी घेत आहे.
अशीच जिद्द आणि चिकाटी होती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांकडे.
आज आपल्यातील कष्ट करण्याची जिद्द संपली की आपण लगेच अंधश्रद्धा, जादूटोणा यांच्यावर विश्वास ठेवतो.
असाच विश्वास स्वतःवर कधी ठेवलाय का...?
छत्रपती शिवरायांना स्वतःवर विश्वास होता म्हणून तर त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या सवंगड्या सोबत ओठांवर मिसरूड फुटायच्या आधीच स्वराज्याचा संकल्प केला होता.
आणि तो पुर्ण करण्यासाठी मरेपर्यंत कष्ट घेतले.
मग आमच काय ?
आम्ही आजपर्यंत किती संकल्प केलेत हो.
आणि किती पुर्ण केलेत.
नुसताच शिवरायांचा फोटो छाताडावर लावून बोंबलत फिरण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा प्रचार करा.
तेवढे जरी होत नसेल तर किमान स्वतः तरी त्यांच्या विचारांचे पाईक व्हा.
एवढ जरी केले तरी भरपूर झाले.
अजुन एक आपल्या देशात पेव फुटले आहे.
ते म्हणजे "जात" मी अमुक जातीचा तु तमुक जातीचा
मला एक सांगा,
आम्ही जातीसाठी एकमेकांची डोकी फोडतोय. आणि
तिकडे सिमेवरती जवान आपल्या रक्षणासाठी रात्रंदिवस झटत आहेत.
आपल्या सगळ्यांचा गरजा सारख्याच ना तोंडानेच खातो आणि बुडानेच सोडतो ना.
का आणखी काही वेगळे करतो.
मग कशापायी आपण आपापसांत भांडतो.
एक लक्षात ठेवा जोपर्यंत आपण आपापसात भांडत बसू त्या त्या वेळी असेच आतंकवादी हल्ले होत राहतील. ते म्हणतात ना
"दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ"
बघा विचार करा ही वेळ तुमच्यावर ही येवू शकते.
जय हिंद
जय महाराष्ट्र
स्वतंत्र भारताचा एक नागरिक
- ज्ञानेश्वर संभाजी शिंदे